शिक्षकरत्न पुरस्काराने विजय जाधव सन्मानित

जामखेड : सह्याद्री ऊद्योग समुह, अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार विजयकुमार जाधव यांना सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते पाचगणी येथे देण्यात आला.

विजय जाधव हे जामखेड मधील मोहा शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेतील गुणवत्ता पूर्ण अध्यापन! विविध शैक्षणिक ऊपक्रम त्यांनी राबवले आहेत.

या प्रसंगी बोलताना सिंधूताई म्हणाल्या की, महिलांनी अंग प्रदर्शन न करता आपली संस्कृती जपावी, संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवावी. जीवनात मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. मिळालेल्या जन्माचे सार्थक करा असे आवाहन त्यांनी केले. कोणीही आत्महत्या करू नका मला घडवणारा कुंभार आहे, तोच जगाचा गुरू असल्याचे त्या म्हणल्या.

अहमदनगर येथील सह्याद्री ऊद्योग समुहाचे अध्यक्ष संदीप थोरात यांच्या वतीने दरवर्षी शिक्षण शेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो या वर्षी १५० शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी राजेंद्र शिंगणे डॉ अशोक तनपुरे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.