जयपूर – देशांतर्गत सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्र आणि सर्व्हिसेस संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सौराष्ट्राने विदर्भचा सात विकेट्सने धुव्वा उडवत बुधवारी उपांत्य फेरीत धडक मारली.
सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटच्या नेतृत्त्वात प्रथम गोलंदाजी करत विदर्भला 40.3 षटकात 150 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात प्रेरक मांकडच्या 72 चेंडूत नाबाद 77 धावांच्या जोरावर 20.1 षटके बाकी असताना 3 बाद 151 धावा करत विजय मिळविला.
स्पर्धेच्या अन्य सामन्यात केरळचा सर्व्हिसेसने 7 गडी राखून पराभव केला. केरळने दिलेले 176 धावांचे आव्हान सर्व्हिससने 30.5 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.