मुंबई – बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये सध्या विजय देवरकोंडाच्या लायगर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे विजय बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजय अनेक ठिकाणी जात आहे. विजयच्या स्टाईलची संपूर्ण साऊथमध्ये तर चर्चा आहेच परंतु सध्या विजय प्रमोशनदरम्यान केवळ साधी चप्पल घालून फिरत असल्यामुळे जोरदार चर्चेत आला आहे. आता यावर स्वतः विजयने खुलासा केला आहे.
रणवीर सिंगनेही केले भाष्य
लायगरच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले तेव्हा ते पाहून सगळेच थक्क झाले. या इव्हेंटमध्ये करण जोहर आणि अनन्या पांडे वरपासून खालपर्यंत टिप टॉपमध्ये पोहोचले होते. तर विजय देवराकोंडाला पाहून लोकांचा विश्वास बसत नव्हता. साधा टी-शर्ट, पायात 199 रुपयांची चप्पल. हे पाहून सर्वच हैराण झाले, पण अभिनेता रणवीर सिंग कुठे स्वत:वर नियंत्रण ठेवणार होता? विजयच्या स्टाईलवर भाष्य करताना कार्यक्रमाचा खास पाहुणा रणवीर म्हणाला की भावाची स्टाइल बघा, तो माझ्या ट्रेलर लाँचला आला आहे की मी त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला आहे हे कळत नाही. ज्यावर सर्वजण मोठ्या हशा पिकला.
या कारणामुळे घातली चप्पल
विजय देवरकोंडाचा स्टायलिस्ट हरमनने आता एका मुलाखतीत या लूकमागचे कारण स्पष्ट केले आहे. त्याने सांगितले की, विजयलाही सुपर स्टायलिश लूक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण शेवटच्या क्षणी विजयच्या सांगण्यावरून त्याचा लूक बदलण्यात आला. खरे तर, विजयची इच्छा होती की लायगरमधील त्याच्या व्यक्तिरेखेसारखाच लूक त्याला ट्रेलर लॉन्चच्या वेळी हवा होता म्हणून त्याने चप्पल मागवली आणि ती परिधान करून तो कार्यक्रमाला पोहोचला. त्याची कल्पना खरोखरच आश्चर्यकारक ठरली. कारण तेव्हापासून या कार्यक्रमात फक्त लायगर आणि विजयच्या लूकच्या ट्रेलरचीच चर्चा होत आहे.