नवी दिल्ली – आगामी आयपीएल 2022-च्या पार्श्वभूमीवर लखनौ फ्रॅंचायजीने भारताचा माजी यष्टीरक्षक, फलंदाज विजय दहिया यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
आयपीएलचा नवीन संघ असलेल्या लखनौ फॅंचायजीने सहाय्यक प्रशिक्षकपद दिल्याबद्दल विजय दहिया यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विजय दहिया म्हणाले, मला लखनौ आयपीएल फ्रॅंचायजीसोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल आनंदी आहे आणि फॅंचायजीचा आभारी आहे. दरम्यान, विजय दहिया यांनी भारताकडून दोन कसोटी आणि 19 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
आरपीएसजीचा भाग असलेल्या लखनौ संघाने यापूर्वी अँडी फ्लॉवरला संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि गौतम गंभीरची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.