माळेगाव, (वार्ताहर)- माळेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी विजय बंडू भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. सोसायटीच्या सभागृहात माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली.
यावेळी संचालक मंडळाने एकमताने विजय भोसले यांचे नाव जाहीर केले. निवडीनंतर विजय भोसले यांनी आपण संस्थेची ध्येय धोरणे व उद्दिष्टे लक्षात घेऊन संस्थेचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान रंजन तावरे यांच्या हस्ते मीटिंग हॉलचे नामदेवराव सस्ते सभागृह असे नामकरण करण्यात आले. यावेळी बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक मनोज सस्ते, संस्थेचे चेअरमन निशिगंध तावरे, माजी चेअरमन संपतराव लोणकर, मावळते उपाध्यक्ष अभिजीत तावरे,
संचालक शशिकांत तावरे, वसंतराव तावरे, प्रमोद जाधव, विनोद सस्ते, रमेश नलवडे, दिलीप बुरुंगले, प्रताप तावरे, गौरव निंबाळकर, बाळासाहेब सस्ते, वीरेंद्र भुंजे, सचिव विकास तावरे, शशिकांत देवकाते, सभासद उपस्थित होते.
माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन जुन्या ज्येष्ठांनी हे संस्था अत्यंत विचारपूर्वक व शेतकऱ्यांच्या हिताकरिता १९५१ साली स्थापन केल्याचे सांगितले.
आज संस्थेची झालेली प्रगती पाहून रंजन तावरे यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेची शंभर टक्के वसुली झालेली असून संस्था आत्ता प्रगतीपथावर असल्याची माहिती मावळते उपाध्यक्ष अभिजीत तावरे यांनी दिली. मनोज सस्ते यांनी आपल्या मनोगतात संस्थेचा होत असलेला नावलौकिक व कामाचा आढावा घेतला. आभार प्रमोद जाधव यांनी मांडले.