पुणे – गेल्या काही वर्षांत निवडणुकीदरम्यान प्रचारफेऱ्या, पदयात्रा रोडावत असताना शिवाजीनगर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारफेऱ्या, पदयात्रांना कायकर्ते आणि स्थानिक मतदार यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
शनिवारी औंध भागातील परिहार चौक, डीएव्ही शाळा, मेडिपॉइंट हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर पुतळा, भाले चौक, औंध गाव गुरुद्वारा, मंगेश सोसायटी, औंध गावठाण, सिद्धार्थनगर, भाजी मंडई, जय महाराष्ट्र चौक, रोहन नीलय सोसायटी या भागात अशीच परिस्थिती होती. परिहार चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्याबरोबर अनेक सामान्य मतदारही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
शुक्रवारी रिपाइं (आ.) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ शिरोळे यांची भेट घेतल्यानंतर शनिवारच्या पदयात्रेत त्यांचा लक्षणीय सहभाग होता. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात रिपाइं कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. यावेळी नगरसेवक परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, मधुकर मुसळे, अर्चना मुसळे, सचिन वाडेकर, विजय शेवाळे, अनिल भिसे, गणेश गायकवाड, सुरेश चोंदे, बाळासाहेब रानवडे, गणेश केळापुरे, पौर्णिमा रानवडे आदी उपस्थित होते.
“केवळ खासदारपुत्र म्हणून आम्ही सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव ऐकले होते. पण पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न, शहरात इलेक्ट्रिक बसेस आणण्यामधील त्यांचे योगदान या बाबी समोर येत गेल्या. त्यामुळे आमचा दृष्टीकोन बदलला. आमच्या मतदार संघात असेच व्हिजन असलेला तरुण, अभ्यासू आमदार हवा,’ असे यावेळी स्थानिकांनी सांगितले.
या आधी शिरोळे यांनी गोखलेनगर परिसरातील नीलज्योती येथील गजानन गार्डन, शिवाजी हाऊसिंग सोसायटी-प्रकाश बहिरट उद्यान आणि गोखलेनगर- कै. शकुंतला निकम उद्यान येथेदेखील भेट देत संवाद साधला. या वेळी नगरसेवक आदित्य माळवे, राजश्री काळे, डॉ. अपर्णा गोसावी, दत्ता खंडाळे, जितू मंडोरा, प्रवीण शेळके, नीलेश घोडके आणि विकास डाबी आदी उपस्थित होते. बोपोडी येथील शिवसेनेच्या शाखेलादेखील शिरोळे यांनी भेट दिली.