पर्यटक भाविकांसाठी स्टेरेलियम लिक्वीडचा वापर
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
सुट्टीत भाविक पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना करोना पासून संरक्षणासाठी खबरदारीचा उपाय म्हणून स्टेरेलियम लिक्विडचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या मुलांच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. परंतु ह्या आठवड्यात बहुतांश परीक्षा संपत असल्याने पर्यटक भाविकांची गर्दी वाढणार आहे. त्यातच सध्या जगभर करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.
या विषाणूपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने अंबाबाई मंदिरात खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
करोनापासून रक्षण व्हावे म्हणून अंबाबाई मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर देवस्थान समितीच्यावतीने स्टेरेलीयमल लिक्विडचा वापर केला जात आहे.अंबाबाई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटक भाविकाच्या हाताला हे लिक्विड लावले जात आहे.