पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी विजेवर चालणारे दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या गॅलरीत येऊन मेणबत्ती, पणती, दिवा, टॉर्च लावावा असेही आवाहन केले आहे. मात्र दिवा, पणती, मेणबत्ती लावताना सावधान.
कोणीही सॅनिटायझर लावून काडेपेटीतील काडी पेटवू नका, नाहीतर हात भाजण्याची शक्यता आहे.
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. अल्कोहोल आगीच्या संपर्कात आल्यास ते लगेचच पेट घेते. त्यामुळे सॅनिटायझर लावून ही मेणबत्ती किंवा, दिवा पेटवल्यास हात भाजण्याचा संभव आहे. त्यामुळे ही कृती करताना सावधतेने करा.