Ho Chi Minh City – ध्रुव कपिलाच्या आजारपणामुळे, ध्रुव व तनिषा क्रास्टो (Dhruv Kapila and Tanisha Crasto) या भारतीय जोडीला व्हिएतनाम ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घावी लागली आहे. त्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
कपिला व क्रास्टो यांच्या जोडीसमोर इंडोनेशियाच्या अदनान मौलाना आणि इंदाह काह्या सारी जमील या जोडीचे उपांत्य फेरीत आव्हान होते. परंतु, ध्रुव कपिलाला ताप व पाठीच्या दुखण्यामुळे या लढतीतून माघार घावी लागली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून माझी प्रकृती चांगली नव्हती. कालच्या लढतीनंतर अजूनच परिस्थिती खराब झाली. ताप देखील उतरत नव्हता त्यातच पाठीचे दुखणे सुरु झाल्याने आम्ही या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असे ध्रुव कपिलाने पीटीआयअशी बोलताना सांगितले.
ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची जोडी 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या बेंडीगो इंटरनॅशनल व 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सिडनी इंटरनॅशनल या दोन्ही स्पर्धेत सहभागी होतील.