Vidya Wires IPO: गुजरातमधील वाइंडिंग आणि कंडक्टिव्हिटी उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी विद्या वायर्सचा लवकरच आयपीओ येण्याची शक्यता आहे. कंपनी आयपीच्या माध्यमातूनपैसे उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यासाठी सेबीकडे ड्राफ्ट कागदपत्रे जमा केली आहेत. IPO मध्ये 320 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स असतील. तसेच, प्रमोटर्सकडून 1 कोटी शेअर्सची विक्री केली जाईल.
विद्या वायर्स ही तांबे आणि ॲल्युमिनियम वायर उद्योगातील चौथी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1981 मध्ये झाली. कंपनीकडून प्रिसिजन-इंजिनीयर्ड वायर, इनॅमल कॉपर, रेक्टँग्युलर स्ट्रिप्स, पेपर इन्सुलेटेड कॉपर कंडक्टर, कॉपर बसबार, स्पेशलाइज्ड वायंडिंग वायर, पीव्ही रिबन आणि ॲल्युमिनियम पेपर कव्हर्ड स्ट्रिप्स सारख्या उत्पादनांची निर्मिती केली जाते.
कंपनीच्या ग्राहकांमध्ये अदानी विल्मर, अॅटलांटा इलेक्ट्रिकल्स, श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स (इंडिया), इलेक्ट्रोथर्म इंडिया, हॅमंड पॉवर सोल्युशन्स, लुबी इंडस्ट्रीज एलएलपी, सुझलॉन एनर्जी, TMEIC इंडस्ट्रियल सिस्टम्स इंडिया आणि ट्रान्सफिक्स इंडिया यांचा समावेश आहे.
कंपनी उत्पादन क्षमता वाढवण्याचा विचार करत आहे. यासाठी आयपीओच्या माध्यमातून पैसा उभारला जाणार आहे. नवीन शेअर्सच्या विक्रीतून 140 कोटी रुपये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वापरले जातील. 100 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी व उर्वरित रक्कम इतर व्यावसायिक कामासाठी वापरली जाईल. डिसेंबर 2024 पर्यंत, विद्या वायर्सचे थकबाकी कर्जे 142.72 कोटी रुपये होते. दरम्यान, आता सेबीकडून कंपनीच्या आयपीओला कधीपर्यंत परवानगी मिळते हे पाहावे लागणार आहे. सेबीकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकदारांसाठी खुला होईल.