विद्या बालनचे निर्माता म्हणून पदार्पण

लॉकडाऊनमुळे थिएटरमध्ये भलेही नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसले, तरी लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरीज पाहून स्वत:चे मनोरंजन करत आहेत. अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्माद्वारा निर्मित “पाताल लोक’ सीरिजला चाहत्यांकडून चांगलीच पसंत पडली.

तिच्या पाठोपाठ आता अभिनय क्षेत्रात नावाजलेली विद्या बालनसुद्धा निर्माता बनली आहे. विद्याने तिच्या पहिल्या शॉर्ट फिल्म “नटखट’चा पहिला लूक शेअर केला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत लिहिले, तुम्ही एक कथा ऐकाल? निर्माता आणि अभिनेता म्हणून मी माझ्या पहिल्या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक सादर करत आहे. “नटखट’. या शॉर्ट फिल्मची टॅगलाइन आहे- तुम्ही एक कथा ऐकाल?

या पोस्टरमध्ये विद्या बालन देशी लूकमध्ये दिसत आहे. तसेच ती बाळाच्या डोक्‍यावर तेलाची मालिश करीत आहे. दरम्यान, फोटोमध्ये आपण पाहू शकता की ती बाळाच्या डोक्‍यावर मालिश करीत आहे. परंतु तिचे लक्ष अन्य दुसरीकडे आहे.

या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन शान व्यास यांनी केले आहे. प्रोडक्‍शन रॉनी स्क्रूवाला आणि विद्या बालन यांचे आहे. पहिल्या लूकनंतर आता चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे.

दरम्यान, विद्या बालन शेवटच्या वेळी “मिशन मंगल’मध्ये रुपेरी पडद्यावर दिसली होती. त्यानंतर लवकरच ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या शकुंतला देवी चित्रपटात दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.