हॉटेलच्या खोलीमध्ये गुपचूप घुसली विद्या बालन

विद्या बालनला बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिने आतापर्यंत ज्या दमदार भूमिका केल्या आहेत, त्यामुळे तिच्याकडील अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. आपल्या सिने करिअरच्या बरोबर आपल्या वैयक्तिक आयुष्यातही एन्टरटेनमेंट कायम ठेवण्यात विद्या सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये गुपचूप घुसणाऱ्या विद्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. विद्याने स्वतःच आपला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ म्हणजे 1979 मधील “गोलमाल’मधील दिना पाठकच्या एका कॉमेडी सीनचे रिक्रिएशन होते.

या रिक्रिएशनसाठी विद्याने मुंबईतील शालिमार हॉटेलमधील एका खोलीची निवड केली होती. तिच्या या कॉमेडी सीनच्या पोस्टवर इन्स्टाग्रामवर खूप कॉमेंट पडल्या होत्या. सध्या विद्या ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये काम करते आहे. त्यासाठी तिला गणिताचे बारकावे आणि समिकरणे मुखोद्‌गत करण्याचा सराव करायला लागला आहे. विद्याला या बायोपिकमध्ये पाहताना अनेकांना शकुंतला देवींच्या वैयक्तिक जीवनातील तपशीलही पहिल्यांदाच समजणार आहेत. विद्याने त्यासाठी शकुंतला देवींच्या आयुष्याचे बारकावे सविस्तर माहिती करून घेतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.