Vidya Balan : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ ( Raja Shivaji) हा बहुचर्चित चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येत आहे. चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. काल या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन ‘बडी बेगम’ भूमिका साकारणार आहे. या ट्रेलर लाँच सोहळ्यात विद्या बालनने एक किस्सा शेअर केला आहे. याशिवाय तिने या चित्रपटाचा भाग असण्याबाबत आनंदही व्यक्त केला आहे. Vidya Balan विद्या बालन म्हणाली, “सगळ्यांना नमस्कार… अभिषेक आणि संजू म्हणतात की रितेश त्यांचा छोटा भाऊ आहे. पण माझा नाही. मात्र तो माझा चांगला मित्र आहे”. यावर एकच हशा पिकला. रितेशला मी अभिनेत्री म्हणून पसंत नसेल पुढे ती म्हणाली, “मला तुम्हाला एक खरं सांगायचं आहे. जेव्हा मला समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी चित्रपट बनतोय आणि तो रितेश करत आहे. तेव्हा माझ्या मनात आलं की छान. संजू करत आहे, अभिषेक करत आहे पण रितेश माझ्याकडे का आला नाही? मग वाटलं, कदाचित माझ्यासाठी काही रोल नसेल किंवा त्याला मी अभिनेत्री म्हणून पसंत नसावी.” (Vidya Balan) पुढे ती म्हणाली, “पण नंतर तो माझ्याकडे आला. मी आधीच ठरवलं होतं की मी हा सिनेमा करणार आहे. त्याने मला कथा सांगितली आणि मी खूप लक्ष देऊन ऐकत होते. मी त्याला म्हणाले, थोडं विचार करून सांगते, कारण मला माझी उत्सुकता लगेच दाखवायची नव्हती. त्याला कळू नये की मी खरंतर त्याच्या येण्याची वाटच पाहत होते. तो घरून निघून गेला आणि मी लगेच त्याला फोन केला व सांगितलं मी हा सिनेमा करत आहे. बडी बेगम पात्राबद्दल त्यानं ज्याप्रकारे मला माहिती दिली ती ऐकून मी थक्क झाले. मला रितेशसोबत काम करुन खूप चांगलं वाटलं”. यावेळी तिने चित्रपटामध्ये सहभागी असल्याबद्दल आनंद व्यक्त करत म्हंटले की, “माझा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या भव्य मराठी चित्रपटाचा भाग होणे, ते पण छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात काम करणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानची बाब आहे. त्यामुळे खूप उस्तुक आहे”, या शब्दात विद्यानं आनंद व्यक्त केला. Vidya Balan हेही वाचा: Swanandi Sardesai: स्वानंदी सरदेसाई झाली नवरी; पारंपरिक लूकने जिंकली चाहत्यांची मनं