Vidya Balan : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूडसह तिने साऊथ सिनेसृष्टीतही काम केले आहे. तिथेही तिचे लाखो चाहते आहेत. मात्र सध्या विद्या तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे.
विद्यानं बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये तुलना करत एक मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली की, “मला असं वाटतं की साऊथचे कलाकार फार शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं काम करतात. तिकडे कायम कमी बजेट, मीडियम साईजचे सिनेमा होतात. मात्र तरीही ते कमालीचे यशस्वी होतात. मीडियम साईजच्या त्या चित्रपटांसाठी जास्त मेहनत करावी लागतेत्यामुळे ते काम करताना फार मेहनत करतात,” असं विद्या बालन म्हणाली.
पुढे ती म्हणते, “मी कधीच बॉलिवूडमध्ये कोणत्या ब्लॉकबस्टर सिनेमा काम केलं नाहीये. त्यामुळे इथली पद्धत काय असते मला माहित नाही. कोणतीही गोष्टी ऑथेंटिक असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं साऊथ इंडस्ट्रीत ते जास्त पाहायला मिळतं. बॉलिवूडमध्ये ऑथेंटिक पद्धतीने काय होतं? बॉलिवूड हे माझं कुटुंब आहे. पण, मी एक साऊथ इंडियन आहे. मी बऱ्याच साऊथ कलाकारांना भेटले आहे. ते लोक त्यांच्या कामाकडे नोकरी असल्यासारखं पाहतात.” दरम्यान, विद्या बालन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.