विद्या बालनने आपल्या जुन्या फोटोंपैकी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने जोकरचा ड्रेस घातलेला दिसतो आहे. शोमॅन राज कपूर यांना आदरांजली वाहण्यासाठी तिने राज कपूर यांच्या “मेरा नाम जोकर’मधील ड्रेस घातला आहे.
व्हाईट पॅन्ट, लाल शर्ट आणि ब्लॅक पोल्का घातलेली विद्या अगदी “जोकर’मधील राज कपूर दिसते आहे. एवढेच नव्हे तर नाकावर तिने लाल चेंडूही चिकटवला आहे. राज कपूर यांच्या स्टाईलमध्ये मोठा हार्ट आकाराचा बलून घेऊन “जीना यहां मरना यहां, इसकेसिवा जाना कहां’ असे गाणे म्हणताना विद्या दिसते आहे.
लॉकडाऊनमध्ये घरी बसल्या बसल्या असे बरेचसे उद्योग पब्लिकला सुचत आहेत. राज कपूर यांची आठवण काढण्याच्या निमित्ताने विद्याने आपली जोकर बनण्याची हौसदेखील भागवून घेतली आहे. सध्या जोपर्यंत सर्व सिनेमांची शूटिंग बंद आहेत, तोपर्यंत आपल्या आठवणीतील अनेक व्हिडिओ, फोटो आणि जुन्या करामतींचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतःची करमणूक करण्याचे काम सगळ्यांनीच सुरू केले आहे. त्याचाच हा प्रकार आहे. बाकी विद्याने आपल्याकडे नवीन कोणता प्रोजेक्ट आहे, हे काही सांगितलेले नाही.