संत तुकाराम साखर कारखान्यावर विदुरा नवलेंची एकहाती सत्ता

विरोधी पॅनलला मतदारांनी सपशेल नाकारले
पिरंगुट  – कासारसाई (ता. मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी माजी खासदार, कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला पुन्हा एकहाती सत्ता दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आर. एस. धोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरूण साकोरे, श्रीकांत श्रीखंडे, शाहूराज हिरे, हर्षित तावरे, बी.एस.घुगे, दिग्विजय राठोड, संतोष शिरसेटवार यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. त्यासाठी सुमारे दिडशे कर्मचारी पन्नास टेबलवर कार्यरत होते.

महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत नवले पॅनलच्या ताराबाई सोनवणे (8773), शुभांगी गायकवाड (9782) या विजयी झाल्या. त्यांनी बंडखोर रूपाली दाभाडे (1475)यांचा पराभव केला. येथे 608 मते बाद झाली. भटक्‍या विमुक्त जाती व जमातीच्या गटात नवले पॅनलचे बाळकृष्ण कोळेकर (9815) विजयी झाले. त्यांच्या विरूद्ध बंड पुकारलेले सुरेश जाधव यांना केवळ 225 मते पडली. पॅनलला पाठींबा दिलेले शिवाजी कोळेकर यांना 461 मते पडली. येथे 1036 मते बाद झाली. इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये पॅनलचे चेतन भुजबळ (9748) विजयी झाले असून त्यांच्या विरूद्धचे अरूण लिंभोरे यांना 1143 मते मिळाली. यागटात 713 मते बाद झाली. अनुसूचित जाती, जमाती गटात बाळू गायकवाड 9634 मतांनी विजयी झाले. त्यांनी सखाराम गायकवाड (972)यांनी पराभूत केले. येथे 705 मते बाद झाली.
…आंघोळ करणार – पाचंगे
पर्यंतचे मद्य बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासन आदेशानुसार एका व्यक्तीला दिवसाला 12 लिटर म्हणजेच महिन्याला 360 लिटर दारू पिण्यास परवानगी मिळाली आहे असाच अर्थ निघतो. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने व्यसनमुक्ती एक संकल्प ही अधिकृत पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेमध्ये दारू पासून होणारे विविध आजार व त्याच्या दुष्परिणामाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, परंतु नोंदणी अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून मद्य सम्राटांच्या दबावाखाली आदेश काढून एक प्रकारे दारूच्या व्यसनाचा प्रचार-प्रसार केला आहे. त्यामुळे नागरिकांना व्यसनाधीन करून त्यांच्या संपत्तीवर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार दोषींवर विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यास परवानगीही या निवेदनात मुख्यमंत्र्यांकडे मागण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत विधिमंडळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाचंगे यांनी दिली आहे.
मुळशी तालुका
हिंजवडी – ताथवडे गटात पांडुरंग राक्षे यांनी पॅनलला पाठींबा दिल्याने येथे औपचारिकता राहिली होती. या गटात विदुरा नवले यांना 9974 मते मिळाली. तर बाळासाहेब बावकर 9421 आणि तुकाराम विनोदे 9090 मते मिळवून विजयी झाले. ात 715 मते बाद झाली आहेत. पौड – पिरंगुट गटाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या गटातील दिलीप दगडे यांना 9401 मते मिळाली. तर अंकुश उभे 9438 आणि महादेव दुडे 8679 मते मिळवून विजयी झाले. संग्राम मोहोळ यांना मात्र 2337 मतांवर समाधान मानावे लागले. येथे 587 मते बाद झाली.
मावळ तालुका
सोमाटणे – पवनानगर गटातून नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, शामराव राक्षे हे बिनविरोध निवडून आले होते. सुरूवातीला रंगतदार वाटलेली तळेगाव – वडगाव गटातील निवडणूक मात्र एकतर्फीच झाली. या गटातील बापूसाहेब भेगडे (9192), ज्ञानेश्‍वर दाभाडे (9131) आणि शिवाजी पवार (9109) हे पॅनलचे उमेदवार विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या गेल्या पंचवार्षिकमध्ये नवले विरोधी पॅनलचे नेतृत्व केलेल्या बाळासाहेब नेवाळे यांना अवघी 1415 मते पडली. तर पंढरीनाथ ढोरे (633), तुकाराम नाणेकर (824) यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढवली.
खेड-शिरूर-हवेली गट
प्रविण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहिते, अनिल लोखंडे या पॅनलच्या उमेदवारांच्या विरोधात अरूण लिंभोरे यांनी दिलेली एकाकी लढत सपशेल अपयशी ठरली. या गटात प्रविण काळजे (9687), मधुकर भोंडवे (9510), दिनेश मोहिते (9230), अनिल लोखंडे (9073) हे विजयी झाले. तर लिंभोरे यांनी फक्त 921 मते मिळाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.