#PICF2020 : भारताचा युवा ग्रँडमास्टर विदीतची बरोबरी

प्राग : भारताचा युवा ग्रँडमास्टर विदीत गुजराथी याला प्राग बुध्दिबळ फेस्टिव्हल मास्टर्स स्पर्धेतील दुस-या फेरीत प्रतिस्पर्ध्यांविरूध्द बरोबरीत समाधान मानावे लागले.

दुस-या फेरीत विदीत गुजराथी आणि डेव्हिड अँठ गुजारो याच्यांतील डाव बरोबरीत सुटला. दुस-या फेरीनंतर स्पर्धेत विदीतचे १.५ गुण झाले आहेत.

दरम्यान, पहिल्या फेरीत विदीतने अमेरिकेच्या सॅम शँकलँड याचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.