पिंपरी विधानसभा : एकूण ५२ जणांनी नेले १२१ अर्ज

पिंपरी – विधानसभा मतदारसंघातून सोमवारी (दि.30) 33 जणांनी 90 अर्ज नेले. तर, आत्तापर्यंत 52 जणांनी 121 अर्ज नेले आहेत. अपक्ष म्हणून अजय हनुमंत लोंढे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.

भाजपकडून माजी नगरसेवक राजेश पिल्ले, भीमा बोबडे, तेजस्विनी कदम तर, शिवसेनेकडून नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांनी आज अर्ज नेला. अमित गोरखे यांनी भाजपकडून आणि अपक्ष म्हणून तर, राष्ट्रवादी कॉंगेस आणि अपक्ष म्हणून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी अर्ज नेला आहे. राष्ट्रवादीकडून नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, राजू बनसोडे यांनी अर्ज घेतला आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. दरम्यान, शिवसेनेकडून ऍड. भोसले, ऍड. मुकुंद ओव्हाळ यांनी देखील अर्ज नेलेला असल्याने बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. पिंपरी मतदारसंघासाठी भाजपकडून पिल्ले, गोरखे, बोबडे, कदम यांनी अर्ज नेले आहेत. तर, चंद्रकांता सोनकांबळे यांनी आरपीआय (आठवले गट) आणि भाजप असे वेगवेगळे अर्ज घेतले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार असल्याचे गेल्याच आठवड्यात जाहीर केलेले आहे. कॉंग्रेसने पिंपरीतील जागेसाठी मागणी केलेली आहे. राष्ट्रवादीकडून पिंपरी मतदारसंघासाठी ओव्हाळ, शिलवंत-धर, बनसोडे, उत्तम हिरवे, मीनाताई खिलारे यांनी अर्ज नेले आहेत. तर, कॉंग्रेसकडून विजय ओव्हाळ, गौतम आरकडे, सुंदर कांबळे, मनोज कांबळे यांनी अर्ज घेतले आहेत. मनसेकडून शाम घोडके, अनिल शिंदे यांनी अर्ज नेले आहेत. तर, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.