पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे सौदागर येथील गृहनिर्माण सोसायट्यांतील नागरिकांशी संवाद साधला. पिंपळे सौदागरमध्ये झालेली विकासकामे आणि प्रगतीपथावर असलेली कामे तसेच नियोजित विकासकामांबद्दल आमदार जगताप यांनी माहिती दिली. नागरिकांनी आमदार जगताप यांच्या विकासाचे कौतुक करून त्यांनाच मतदान करण्याचा निर्धार केला.
गृहनिर्माण सोसायट्यांतील नागरिकांनी चिंचवड मतदारसंघ तसेच पिंपळे सौदागर भागात झालेल्या विकसकामांबद्दल आमदार जगताप यांचे कौतुक केले. तसेच जगताप यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्तकेला. त्याचप्रमाणे मतदारसंघातील इतर नागरिकांनीही आमदार जगताप यांना मतदान करून त्यांनी केलेल्या विकासकामाला पसंती द्यावी, असे आवाहन गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी केले.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, पवना सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, अरुण चाबुकस्वार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर
बिरारी यांनी केले.