आमदार लांडगेंमुळे शहराची क्रीडानगरीच्या दिशेने वाटचाल

स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांचे प्रतिपादन

पिंपरी – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची क्रीडा नगरी अशी ओळख निर्माण व्हावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी चालविलेले प्रयत्न स्तुत्य असून त्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्‍वास पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी
व्यक्‍त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ इंद्रायणीनगर भोसरी येथे आयोजित बैठकीत मडिगेरी बोलत होते. यानंतर मोशी, भोसरी प्राधिकरण परिसरात आमदार लांडगे यांचे प्रचारपत्रक वाटून प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे भोसरी व खेड सहसंपर्कप्रमुख व कामगार नेते इरफान सय्यद भोसरी शिवसेना प्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेविका नम्रता लोंढे, माजी नगरसेविका वर्षा मडेगिरी, कामगार नेते हनुमंत लांडगे, युवा नेते योगेश लोंढे आदी उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की, पिंपरी चिंचवडची उद्योगनगरी, सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख आहेच. त्याबरोबरच शहराची क्रीडा नगरी म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल साकारात आहे. भोसरीतच बंदिस्त गॅलरी असलेले स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स उभारण्यात येत आहे. इंद्रायणीनगरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे लोकार्पणही करण्यात आले आहे. जाधववाडी चिखली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीपर्पज स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. चऱ्होली येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. आण्णासाहेब मगर स्टेडियमलाही गतवैभव प्राप्त करून देऊन पिंपरी चिंचवडचा नावलौकिक क्रीडा नगरी, असा व्हावा यासाठी आमदार लांडगे प्रयत्नशील असल्याचे मडिगेरी म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.