हिंगोली : विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी एक मोठे विधान करत सर्वांना इशारा दिला आहे. आपले दोन आमदार विधानसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडतात. जर आपले 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि समुद्रात नेऊन टाकू, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी रणशिंग फुंकलं आहे. “आपले दोन आमदार आहेत तर विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहत नाही. जर आपले 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि समुद्रात नेऊन टाकू, त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे, असे विधान आमदार बच्चू कडू यांनी हिंगोलीच्या कळमनुरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले.