मुंबई : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या विरोधात काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. काँग्रेस हायकमांडने या आमदारांचा पत्ता कट केला आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका, असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले आहेत.विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती.
त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली.या बैठकीत काँग्रेस पक्षाकडून 5 आमदाराला विधानसभा निवडणुकीत पक्षाच तिकीट देऊ नका, असे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना आदेश दिले आहेत. ज्या आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे त्या आमदारांच्या पाच मतदार संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, असे देखील आदेश दिले आहेत.
‘या’ आमदारांवर करण्यात आली कारवाई
सुलभा खोडके (अमरावती विधानसभा)
झिशान सिद्दीकी ( वांद्रे पूर्व विधानसभा)
हिरामन खोसकर (इगतपुरी विधानसभा)
जितेश अंतापूरकर (नांदेड दक्षिण विधानसभा)
मोहन हंबर्डे (देगलूर विधानसभा)