Vidhan Parishad Results | विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २७४ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून यामुळे कोणाचा पत्ता कात होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अशातच आता भाजप नेते व महायुती पुरस्कृत उमेदवार योगेश टिळेकर यांनी विजयी आघाडी घेतली आहे. विधानपरिषदेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची २३ मतं आवश्यक आहेत. टिळेकर यांनी पहिल्या पसंतीच्या २३ मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांचा विजय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेची ३ उमेदवार देण्यात आले असून यामध्ये ठाकरेंच्या पक्षाचे मिलिंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील व काँग्रेसच्या प्रज्ञा सावंत यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका महायुतीतील पक्षांसाठी आगामी विधानसभा निवडणुकांचं गणित सेट करण्यासाठी महत्वाच्या असल्याचं मानलं जात आहे. महायुतीने ११ जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
यामध्ये भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार तर शिंदे यांच्या शिवसेनेचे २ व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे २ असे ९ उमेदवार रिंगणात आहेत.