Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. याकरिता पुढील आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५, शिंदेसेनेला २, राष्ट्रवादी (अजित पवार)ला एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळेल, असे चित्र आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)कडे अधिकची १३ मते आहेत. त्यामुळे त्यांनी दुसरी जागा लढवावी, असे महायुतीने ठरवले तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागू शकते. Nilam Gorhe विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी आता अनेक नेतेमंडळी इच्छुक आहेत. अनेकांनी आता विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून कोणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Vidhan Parishad Election 2026 विधान परिषदेतील कोणत्या 9 आमदारांचा संपणार कार्यकाळ? राजेश राठोड (काँग्रेस) उद्धव ठाकरे (उबाठा) नीलम गोऱ्हे (शिवसेना) प्रवीण दटके (भाजप) रमेश कराड (भाजप) गोपीचंद पडळकर (भाजप) रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप) शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट) हेही वाचा: Vinod Kambli: विनोद कांबळीच्या तब्येतीची अपडेट समोर; ब्रेन स्ट्रोकचा धोका, मित्रांनी दिला मदतीचा हात