शिमला : देशभरात पावसाने थैमान घातल्यानंतर पूर स्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्याला तडा गेल्याने रस्ते खचले आहे. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नद्यांजवळील पूल तुटले आहे. तर काही ठिकाणी नद्यांनी धोकादायक तळी ओलांडून वाहत आहे. पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष पूरग्रस्त भागाची दौरे करत आहेत.
#WACTH | Himachal Pradesh Tribal Development Minister & MLA from Lahaul and Spiti, Ramlal Markanda cross a rivulet in Shansha Village where a bridge was damaged due to another flash flood in the region pic.twitter.com/hMdIiMYR3e
— ANI (@ANI) July 30, 2021
यातच काही दिवसांपूर्वी, हिमाचल प्रदेशातील कनौर येथे दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता. अद्यापही येथील नद्यांना पूर असल्याने प्रवास धोकादायकच बनला आहे. अशा परिस्थितीही हिमाचल प्रदेशचे आदिवासी विकासमंत्री यांनी चक्क हातावर चालून वाहत्या पाण्यातून मार्ग काढला आहे.
सध्या त्यांचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये हिमाचल प्रदेशचे आदिवासी विकासमंत्री रामलाल मार्कंड हे वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी टाकलेल्या शिडीवरुन हातावर चालताना दिसत आहेत. ते लाहौल आणि स्पीती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शंशा या गावातील पूल तुटल्यामुळे तेथे अशा पद्धतीने जुगाड करुन त्यांनी रस्ता पार केला.
दरम्यान, हा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांची स्तुती केली आहे तर विरोधकांनी पॉलिटिकल स्टंट म्हणून केली आहे.