मुंबई – देशभरात 73 वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले की,’संविधान आणि लोकशाहीचे संवर्धन झाले तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधान आणि लोकशाही रक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज राहावे.’
आजचा दिवस हा देशासाठी त्याग करणाऱ्या बलिदान देणाऱ्या हजारो-लाखो स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे: आ. @bb_thorat #IndependenceDay2019 pic.twitter.com/BAMKdGezuN
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 15, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वातंत्र्यदिनानिमित्त टिळक भवन दादर येथे ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी थोरात यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी राज्यातील अनेक मुद्यांवर भाषण केले. यावेळी थोरात म्हणाले,’आपल्या पूर्वजांनी मोठा संघर्ष करून, बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही आणली. या लोकशाहीमुळे सर्वांना समान अधिकार मिळाले, देश विकसनशील बनला. मात्र आज सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढा देण्याची गरज आहे, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.