हैद्राबाद – रेल्वे स्थानकावर अनेकजण धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकदा अपघात होण्याची दाट शक्यता असते. तेलंगणातील एका रेल्वे स्थानकावर असाच एक अपघात झाला. मात्र आरपीएफच्या जवानाने वेळीच समयसुचकता साधून महिलेला वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
थोडक्यात गाडी चुकेल म्हणून महिला धावत सुटली होती. गाडीचा वेग अद्याप वाढलेला नव्हता. ती चालत्या गाडीत पटकन दांडा पकडत चढलीसुद्धा. पण तिचा हात सटकला आणि ती थेट गाडीखाली जाऊ लागली. प्लॅटफॉर्मवर असलेल्या RPF जवानाने ते पाहिलं आणि पुढचा मागचा विचार न करता त्या महिलेला वाचवायला तो धावला.
रेल्वे खाली जात असलेल्या महिलेला जवानाने खेचून बाहेर काढलं. त्यानंतर स्थानकवर आरडाओरड झाली. त्यामुळे काही क्षणातच रेल्वे थांबली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
#WATCH | Telangana: A constable of Railway Protection Force (RPF) saved a woman from falling under moving train in Secunderabad. (30.07) pic.twitter.com/evlanew8op
— ANI (@ANI) July 31, 2021
तेलंगणाच्या सिकंदराबाद स्टेशनवरची ही घटना आहे. स्टेशनवर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यामुळे ती समोर आली. या मध्ये दिसतं की एक महिला प्लॅटफॉर्मवरून चालत आहे. तेवढ्यात ट्रेन स्टेशनवरून सुटते.