#व्हिडीओ : पाकिस्तानी चहाच्या जाहिरातीत विंग कमांडर अभिनंदन? 

नवी दिल्ली – भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननेही भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पाकच्या विमानांना माघारी पाठविताना विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तान हद्दीत पडले. आणि पाक सैनिकांनी त्यांना अटक केली. तीन दिवसानंतर अभिनंदन यांना मायदेशी पाठविण्यात आले. परंतु, आता अभिनंदन एका वेगळ्याच कारणाने पाकिस्तानमध्ये चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी चहाची जाहिरात सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये विंग कमांडर अभिनंदनही दिसत आहेत.

पाकिस्तानमधील कराची येथील तापाल (tapal) या चहाची जाहिरात आहे. या जाहिरातीच्या शेवटी अभिनंदन चहाचा घोट घेत म्हणत आहेत कि, ‘टी इज फॅन्टॅस्टिक, थँक यू’ हा व्हिडीओ अनेक जण शेअर करत आहेत.

काय आहे व्हायरल सच 
तापाल चहाच्या कंपनीने विंग कमांडर अभिनंदन यांची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नसून व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे. तुम्ही जर जाहिरातीच्या व्हिडिओला लक्षपूर्वक पहिले तर त्यावर तुम्हाला ‘@iedit_whatuwant’ हा वॉटरमार्क दिसेल. त्यामुळे अशा कोणत्याही जाहिरातीवर विश्वास ठेवू नये आणि असे व्हिडीओ शेअर करू नये.

https://youtu.be/deSi2B17bqE

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)