Video: “आता आम्ही कुठं राह्याचं?” प्रशासनाला आपत्तीग्रस्तांचा प्रश्न…!

पुणे: शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या नवीन खडकवासला कालव्याला गुरुवारी सकाळी जनता वसहतीजवळ भगदाड पडले. त्यामुळे लाखो लिटर पाणी सकाळी सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलावरून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जनता वसाहत परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसलं आहे. तर दांडेकर पूल परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले आहेत. दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून मुठा नदीचा उजवा कालवा जातो, याच कालव्याची भिंत कोसळली. पाणी घुसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये वेळेवर कोणतीही आपत्कालीन सेवा पोहोचली नसल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे.

कालव्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या घटनेमुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. आता आम्ही काय करायचं, असा सवाल स्थानिक महिला  विचारत आहेत.  दैंनंदिनी वापरातील वस्तू देखील पाण्यात वाहून गेल्या आहेत.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना या परिस्थीचा सामना करावा लागला. काही मुली चक्क दीड तास घरात कोंडून होत्या. तर अनेकांची शाळा आज घरातील पाणी बाहेर काढण्याच गेली. त्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा सामना आज सामान्य, गरीब नागरिकांना करावा लागत आहे. या परिसरात अनेक मजूर, छोटे-मोठे उद्योग करणारे लोक राहतात. त्यांचे उद्योगाचे साहित्य देखील पाण्यात वाहून गेले आहे.  शेकडो घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)