लखनऊ : उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव एकमेकांवर जोरदार निशाणा साधताना आपण सर्वांना पाहिलं. पण अनेक वेळा अशी दृश्ये पाहायला मिळतात, जी पटकन कोणाचेही लक्ष वेधून घेतात.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांची सोमवारी यूपी विधानभवनात भेट झाली, तेव्हा असेच दृश्य पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांनी हसतमुखाने हस्तांदोलन केले. आता दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आज नवीन विधानसभेत नवीन आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ विधानसभेत उपस्थित होते. निवडणूक निकालानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.
एएनआय या वृत्तसंस्थेने या बैठकीचा व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अखिलेश यादव हसत हसत हात हलवत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही पुढे जाण्यापूर्वी अखिलेश यादव यांच्या खांद्यावर थोपटले.
#WATCH Uttar Pradesh CM Yogi Adityanath meets Leader of Opposition Akhilesh Yadav in the Legislative Assembly during oath-taking of newly-elected legislators #Lucknow pic.twitter.com/7r6fX7ErjX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 28, 2022
यूपी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार हल्ला चढवत होते. अखिलेश यादव यांनी सीएम योगी आदित्यनाथ यांनाही “बाबा’ म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची खिल्ली उडवत त्यांना ‘बाबुआ’ म्हटले होते. भाजप आघाडीने 273 जागा जिंकल्या, तर सपा आघाडीने 125 जागा जिंकल्या.