मुंबई – सलमान खान नेहमीच आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखला जातो. यो कधी कोणत्या चाहत्याशी मस्करी करेल हे कोणालाही सांगता येत नाही. चाहत्यांना देखील सलमानची प्रत्येक स्टाईल आवडते. नुकतंच सलमानने एका पार्टीवरून जात असताना चक्क ग्लासच आपल्या खिशात टाकला.याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सलमान खान पार्टीला गेला तेव्हा त्याच्या हातात ग्लास होता. गाडीतून खाली उतरताना सलमानने थेट ग्लासच आपल्या पँटच्या खिशात घातला. आता चाहत्यांना मात्र प्रश्न पडलाय की त्या ग्लासमध्ये नेमकं आहे तरी काय ? सलमान खान तो काचेचा ग्लास सोडायला तयार का नाही. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सलमान खान गाडीतून उतरताना हातात असलेला ग्लास जीन्सच्या खिशात ठेवताना दिसतोय.
View this post on Instagram
शनिवारी सलमान खान मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला असताना ही घटना घडली.सलमाचा हा दबंग अंदाज चाहत्यांना सुद्धा खूपच आवडला आहे. अनेकांनी त्या ग्लासात सलमानचे औषध असल्याचे म्हंटले आहे तर अनेकांनी तो डायट फॉलो करत असल्याचे सोशल मीडियावर म्हंटले आहे. सलमानच्या या अतरंगीपणामुळे नेटकऱ्यानी मात्र चांगलेच तर्क वितर्क लावलेत.