मुंबई – ‘तू झूठा मै मक्कार’ चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या श्रद्धा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. विविध शहरातील ठिकाणांसह रिऍलिटी शोजमध्ये हजेरी लावून श्रद्धा आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देखील श्रद्धा काम करत होती. यासह तिने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केलेल्या तिच्या जन्म दिवसाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धा नुकतीच एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली होती. यावेळी श्रद्धाने आपला वाढदिवस केक कापून साजरा न करता थेट वडापाव वर ताव मारून साजरा केल्याचे पाहायला मिळाले. श्रद्धाचे वडापाव प्रेम तिच्या फॅन्सला देखील माहिती आहे. वडापाव खाऊन बिर्थडे साजरा करतानाच श्रद्धाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये श्रद्धा वडापाव खाण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. एका हातात पूर्ण वडापावणे भरलेली प्लेट तर दुसऱ्या हातात खाण्यासाठी घेतलेला वडापाव असं काहीस चित्र यावेळी पाहायला मिळताना दिसते. श्रद्धाचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर – श्रद्धा कपूर ही जोडी दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.