Video : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा ! घराचं छत पोहोचलं उंच आकाशात

मुंबई – मागील दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीवर वेगाने वारे वाहत आहे. आजही तौक्ते चक्रीवादळाचा भयावह परिणाम पाहायला मिळत आहे. या वादळाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये घराचं छत वाऱ्याने उंच आकाशात गेलेलं दिसून येत आहे.

मुंबई नजीकच्या कल्याण भागातील हा व्हिडीओ आहे. येथे दोन उंच इमारतींच्या मधून आकाशात एका घराचं छत उडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चक्रीवादळाच्या परिस्थितीचा अंदाज आपण लावू शकता.

याआधी मुंबईत चक्रीवादळाने दाणादाण केली आहे. अवघ्या दोन तासांत मुंबईत १३२ झाडं उन्मळून पडली आहेत.  यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.