मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार ‘सलमान खान’ याच्या बहुचर्चित “राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा आज ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. भाई जानच्या राधे चित्रपटाची चाहत्यांमध्ये खास क्रेझ आहे. सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटात सलमान खानसोबत मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, या चित्रपटात सलमान खान राधे हे पात्र साकारणार आहे. तसेच रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, दिशा पटाणी, प्रवीण तरडे आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट खूपच लांबणीवर गेला आहे.