# व्हिडीओ : केरळमधील भूस्खलनाची भयावह घटना सीसीटीव्हीमध्ये कैद  

तिरुअनंतपुरम – केरळला पावसाने झोडपून काढले असून अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. अशीच एक मल्लपुरम जिल्ह्यातील भूस्खलनाची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, केरळमध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांची संख्या 42 झाली आहे. आतापर्यंत 22 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. एक वर्षांपूर्वीच केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. त्या वेळी शतकातील सर्वात मोठा पूर आला होता. आताही पुन्हा पावसाचा जोर चालू असून सरकारने लष्कर, नौदल व हवाई दल यांची मदत मागितली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)