पुणे – अश्विन महिन्यातील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात देवीची नऊ दिवस नऊ रूपात पूजा केल्यावर, अश्विन शुद्ध दशमीला आपण “दसरा’ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा सण मुख्यतः “विजयोत्सव’ म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
याच दिनाचे औचित्य साधून आज (दि. १५) पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराचा गाभारा आकर्षक आणि सुगंधी फुलांनी सजवला असून, मंदीरात सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत आहे.
यावेळी विविध देशी-विदेशी फुलांनी तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते.