नवी दिल्ली : आपला मुलगा नातेवाईकांच्या घरी जाऊन दंगा मस्ती करतोयस. ही गोष्ट एका नराधम बापाला सहन न झाल्याने त्याने मुलाला दंडुक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्या नराधम बापावर कडक कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळाली नाही. या व्हिडिओत एक बाप रागाच्या भरात ७ ते ८ वर्षांच्या मुलाला एका लाकडी दंडुक्याने अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसत आहे. मुलगा गयावया करून ‘पप्पा जाऊ द्या ना पप्पा, असे म्हणत मुलगा विनवणी करत आहे. मात्र तरी देखील हा नराधम बाप मारायचा थांबत नाही. या मारहाणीचे व्हिडीओ चित्रित करणारी त्याची बहिणदेखील वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र वडील तरीही मारहाण करतच आहेत.
Whatsapp पर मिला यह वीडियो, सोचने पर मजबूर करता है कि समाज में ऐसे क्रूर लोग कैसे रह सकते हैं? क्या इस व्यक्ति को ढूंढ कर सजा दी जा सकती है? @stc_india @umashankarsingh @vinodkapri @smritiirani @priyankagandhi @Manekagandhibjp @anjanaomkashyap @ravishndtv pic.twitter.com/kN5WdAx3AP
— Tarun Kaushik (@tarunkaushik02) November 29, 2021
वडिलांनी केलेल्या मारहाणीमुळे मुलाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. दारुच्या नशेत वडिलांनी मुलाला बेदम मारले असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारा इसम एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचे नाव अशोक आहे. नातेवाईकांच्या घरी मस्ती केल्याने अशोकने मुलाला मारहाण केली, असे एका इंग्रजी वर्तमानपत्रात म्हटले गेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुलगा शनिवारी त्याच्या मावशीकडे गेला होता. मुलगा मस्ती करत असल्याने मावशीने अशोकला फोन करून त्याला परत नेण्यास सांगितले. त्यानंतर अशोक मुलाला घरी घेऊन आला. नशेच्या अमलाखाली असलेल्या अशोकनं मुलाला बेदम मारहाण केली. त्याआधी त्याने स्वत:चा मोबाईल मुलीकडे दिला आणि तिला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितले. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.