VIDEO: कोल्हापूरमध्ये बिग बाजारला लागली आग ; ग्राहकांची उडाली मोठी धावपळ

कोल्हापूर: कोल्हापुरातील उद्यमनगर परिसरात असणाऱ्या बिग बाजारला आज दुपारी अचानक आग लागली. बिग बाजार मधील वातानुकुलीन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अचानक ही आग लागल्याचे सांगण्यात आल आहे. दुपारच्या वेळी बिग बाजार मध्ये ग्राहकांची गर्दी  होती. अचानक आग लागल्यामुळे ग्राहकांची मोठी धावपळ उडाली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अर्धा तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली आहे. या आगीत बिग बाजार मधील साहित्याचं किरकोळ नुकसान झालं असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. गेल्या दोन महिन्यातील बिग बाजार मध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना असल्यामुळे अग्निशमन विभागाच्या वतीने पुन्हा एकदा येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.