सोसायटीच्या CCTV कॅमेरॅतून महिलेच्या बेडरूममधील काढला व्हिडीओ; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

पिंपरी – हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवत, तिचे बेडरुममधील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व खजिनदार यांचा सहभाग आढळून आला.

याप्रकरणी या तीनही पदाधिकाऱ्यांवर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 ते 28 सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी- वाकडरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडला. या महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोसायटीचे चेअरमन गणेश शंकर आवटे, सेक्रेटरी सागर शिंदे आणि खजिनदार देवेंद्र सारंगधर या तीन आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. या तीनही आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या बेडरुममधील चित्रीकरण होऊ शकेल, अशा पद्धतीने बेडरुमच्या खिडकीकडे तोंड करुन सीसीटीव्ही लावले.

ही महिला बेडरुममध्ये खासगी कपड्यांवर वावरत असताना या तिघांनी मिळून पाहिले. या सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत समजल्यानंतर हा कॅमेरा काढण्यास सांगितले. मात्र आरोपींनी त्यास नकार दिला. पाळत ठेवून महिलेच्या खासगी कपड्यांवरील चित्रीकरण करणाऱ्या या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.