पुणे : गजा मारणे प्रकरणानंतर पुणे पोलिस शहरात गुंडांची दहशद थांबवणे आणि कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला आहे. तरी देखील पोलिसांना पुण्यातील गुडांच्या दहशदीला आळा घालण्यात पुर्णपणे यश आलेले दिसत नाही. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर असाच एक प्रकार घडल्याने शहरातील गुंडगिरी पुन्हा चर्चेत आली आहे.
सिंहगड रस्त्याच्या नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात एका तडीपार गुंडाने शिवजयंतीच्या दिवशी हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्याला तडीपार करण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असुन त्यात रोशन लोखंडेच्या हातात कोयता दिसत आहे. तर आणखी एका गुंडाच्या हातात बंदुक दिसत आहे.
रोशन लोखंडे असे या गुंडाचे नाव असुन त्याच्यावर याआधी शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याआधीही लोखंडेला तडीपार करण्यात आलं आहे. त्याची तडीपार होण्याची ही दुसरी वेळ आहे.