मुंबई – देशातला सर्वात मोठा रिऍलिटी शो ठरलेला “कौन बनेगा करोडपती’ मध्ये सामान्य लोकांना खेळण्याची संधी मिळते, तसेच अनेक सेलिब्रिटी देखील येथे अमिताभ बच्चन यांच्यासोबत हा बुद्धीचा खेळताना दिसतात.
बॉलीवूडचे शहंशाह, बिग बी, मेगा स्टार अमिताभ बच्चन गेले अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. सध्या या कार्यक्रमाचा 13 वा सीजन सुरु आहे. नुकतंच या लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ने 1000 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी आणि खेळ खेळण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे कुटुंबीय शोमध्ये पोहोचले होते.
Ek-ek episode poore kar #KBC pahunch gaya hai 1000th episode tak aur iss shaandaar pal ko aur khaas banane ke liye KBC ke manch par aa raha hai bachchan parivaar!
Toh zaroor dekhiyega #ShaandaarShukravaar episode, aaj raat 9 baje, sirf Sony par. @SrBachchan pic.twitter.com/pXYJLNGmL9
— sonytv (@SonyTV) December 3, 2021
3 डिसेंबरच्या भागामध्ये अमिताभ बच्चन यांची लेक ‘श्वेता’ आणि लाडकी नात ‘नव्या नवेली नंदा’ सहभागी झाल्या. यावेळी या तिघांनी मिळून केबीसी मध्ये तुफान धमाल केली. या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले अमिताभबच्चन हे स्वतःच्या शोमध्ये कमी बोलताना आणि जास्त ऐकताना दिसले.
#KBC ke 1000 episode ka yeh safar, jeet hai sirf humari nahi aap sabhi ki, kyunki yeh aap sabhi ke pyaar aur support ke bina sambhav nahi tha! Dekhiye 1000th episode ke anokhe aur khoobsurat pal ko #KBC ke #ShaandaarShukravaar episode mein, aaj raat 9 baje, sirf Sony par. pic.twitter.com/HVdTIAKHKW
— sonytv (@SonyTV) December 3, 2021
यावेळी बिग बींनी आपण या कार्यक्रमात का सहभागी झालो हे सुद्धा सांगितलं. ते म्हणाले कि…, “जेव्हा ते चित्रपटांमधून टीव्हीकडे वळत होते, तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की त्यांची प्रतिमा खराब होईल. ‘परंतु, माझी मजबुरी होती.., कारण मला त्यावेळी चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. आणि याच एका गोष्टीमुळे मला टीव्हीकडे वळावे लागले’.
T 4113 – namaskaar .. 🙏 pic.twitter.com/ylxvBrtLzW
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 29, 2021
तसेच, अमिताभ बच्चन यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एक खास व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ पाहून बिग बींच्या शालेय जीवनातील आठवणी ताज्या झाल्या. या व्हिडीओत बिग बींनी आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणीही सांगितल्या होत्या. हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर बिग बी अतिशय भावुक झाले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले.