मुंबई – शहरासह उपनगरांमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. तसेच मुंबईकरांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागली.
#WATCH | Mumbai: Shiv Sena MLA from Chandivali, Dilip Lande makes a contractor sit on water logged road & asks workers to dump garbage on him after a road was waterlogged due to improper drainage cleaning
He says, “I did this as the contractor didn’t do his job properly” (12.6) pic.twitter.com/XjhACTC6PI
— ANI (@ANI) June 13, 2021
यातच मुंबई तुंबल्यामुळे विरोधकांकडून मुंबई महापालिका प्रशासनाला तसेच सत्तेत असलेल्या शिवसेनेला प्रश्न विचारले जात आहे. यावरून सध्या वाद सुरु असतानाच मुंबईत शिवसेना आमदाराकडून कंत्राटदाराला चक्क कचऱ्यानं अघोळ घालण्यात आली आहे. सध्या या व्हिडियो सोशल व्हायरल झाला असून या व्हिडियोवरून शिवसेना आमदारावर टीका केली जात आहे.
व्हायरल व्हिडियोमध्ये, ‘पावसामुळे रस्त्यावर चांगलेच पाणी तुंबले दिसून येत असून आणि बराच कचरा साचलेलाही होता. यावर चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी संताप व्यक्त करत रागाच्या भरात त्यांनी कंत्राटदाराला खाली बसवलं आणि त्यांचा अंगावर रस्त्यावर साचलेला कचरा त्यांच्या टाकला.. ‘
याबाबत एएनआय वृत्तसंस्थेनंही हा व्हिडीओ ट्विट केला असून सध्या सोशलवर हा व्हिडियो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडियोमुळे जेव्हा सोशलवर लांडे यांना ट्रोल करण्यास सुरवात झाली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ते म्हणाले,’मागील कित्येक दिवसांपासून मी कंत्राटदाराशी संपर्क करू त्यांना रस्त्याची सफाई करण्याची विनंती करतोय मात्र ते जबाबदारीनं करत नसल्यानं मी हे केलं आहे.’