चंदिगढ : दिल्लीमधील कार अपघाताची घटना अजून ताजी असतानाच आता अशीच एक घटना चंदिगढमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मात्र या अपघातात तरुणी भटक्या कुत्र्यांना खायला देत असताना कारने जोराची धडक दिल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहार.
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघातग्रस्त तरुणीचे नाव तेजस्विता असून सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या तरुणीला कारने धडक दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत कारचालक तरुणीला धडक देऊन निघून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
#WATCH | A woman was hit by a speeding car in Chandigarh while she was feeding street dogs.
Police says that FIR is being registered. The incident happened in Sector 53 and the woman is currently undergoing treatment at the hospital (16.01)
(CCTV Visuals) pic.twitter.com/dabBgAMY3I
— ANI (@ANI) January 16, 2023
तेजस्विताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,तेजस्विता आपली आईसोबत रोज रात्री भटक्या कुत्र्यांना खायला देत असे. नेहमीप्रमाणे शनिवारीदेखील तेजस्विता आपल्या आईसोबत कुत्र्यांना खायला देत होती. मात्र यावेळी मागून भरधाव वेगात एक कार आली. या कारने तेजस्विताला धडक दिली. तसेच अपघातानंतर न थांबता हा कारचालक थेट निघून गेला.
अपघाताच्या घटनेनंतर तेजस्विताचा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तेजस्विताच्या आईने तिच्या कुटुंबीयांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर तेजस्विताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तेजस्वितावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले जात आहे.