पाचगणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ऋषीभाई शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. सामाजिक काम करताना राजकीय सारीपाटावर माझा व माझ्या कुटुबांतील सदस्यांचा दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी पराभव केला.
तर विरोधात काम करणाऱ्यांविरोधात पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही, असे माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांनी दै. प्रभातला सांगितले. यापुढील राजकीय प्रवास शिवसेनेसोबत करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. असून घाम गाळणाऱ्या माथाडी कामगारांच्या प्रमुख मागण्या सरकारकडून सोडवण्याचा यापुढे प्रयत्न राहणार अहे, अशी माहीती त्यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ऋषीभाई शिंदे मोठे बंधू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश राजकीय भूकंप मानला जात आहे. ऋषीभाई शिदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने मुख्यमंत्री शिंदे यांनी माथाडी कामगारांमध्ये आपली ताकद वाढवली असून,
त्याचा राजकीय फायदा नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानला जात आहे. माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांनी केलेल्या राजकीय भूकंपानंतर जावळ तालुक्यात देखील प्रतिक्रिया उमटल्या असून जावळीत माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेतील प्रवेशाचा फायदा कोणाला होणार ते काळच ठरवेल हे मात्र निश्चित.