आपले कर्तव्य बजावण्यात पोलीस कुठलीही काटकसर करत नाहीत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ते सेवा करत असतात. २४ तास सेवा करत असताना आपल्या घरच्यांना सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही. कठीण परिस्थितीत घराच्याबाहेर पडलो तर घरी परत येऊ का नाही, हे देखील पोलिसाना माहित नसते. काहीदिवसांपासून एका मुलाचा व्हिडियो सोशल मोडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडियो पाहून आपले डोळेही पाणावतील.
या व्हिडीओमध्ये एक पोलीस वर्दी घालून कर्तव्यावर जाण्यास तयार होतो. मात्र त्याचा मुलगा त्याला जाण्यापासून रोखत आहे. त्याचे वडील त्याला समजावतात मात्र मुलगा वडिलांचे पाय कडून त्यांना जाऊ नका म्हणून सांगत आहे. हा व्हिडीओ एका अधिकाऱ्याने ट्विटरवर शेयर केला आहे. ते लिहितात ही वेळ पोलिसाच्या नोकरीची सर्वात भावूक वेळ असते. कठीण प्रसंग आणि 24 तास ड्युटी अशा परिस्थितीतून पोलीस अधिकाऱ्यांना या स्थितीचा सामना करावा लागतो.
https://twitter.com/arunbothra/status/1122326391620427777