मुंबई – उल्हास नगरात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून पाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. येथील शांतीनगर येथे ही घटना घडली. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागातील शांतीनगर परिसरात राजनारायण यादव यांचं स्लायडिंगचं दुकान आहे. यादव यांनी शुक्रवारी दुपारी आपल्या दुकानासमोर गाडी उभी केली होती. या गाडीत यादव यांची 5 लाख रुपये रक्कम असलेली एक बॅग देखील ठेवली होती.
चोरट्यांनी गाडीतील बॅग हेरली. त्यानंतर एका चोरट्याने गाडीची समोरच्या खिडकीची काच फोडली, तर दुसरा चोरटा दुचाकी चालू ठेवून पळण्याच्या तयारीत बाजूला उभा राहिला. पहिला चोरटा खिडकीतून गाडीत घुसला. त्याने गाडीतील बँग घेऊन दुचाकीवरून पळ काढला.
उल्हासनगरात कारची काच फोडून ५ लाखांची रोकड लंपास, शांतीनगर परिसरात घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/qsszzTjoDu
— Anish Bendre (@BendreAnish) November 30, 2021
दरम्यान गाडीची काच फुटल्याचे राजनारायण यांच्या लक्षात आले. त्यानंतर सीसीटीव्ही चेक कऱण्यात आली. आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.