मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. त्यातच या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. चित्रपटातील ‘बाला’ गाणं जोरदार लोकप्रिय झालं असून, या गाण्याने तरुणाईला वेड लावलं आहे. चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख, बॉबी देओल, अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे, बोमण इराणी, क्रिती खरबंदा अशी तगडी स्टार कास्ट दिसून येत आहे.
दरम्यान, ‘हाऊसफुल’ चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुख या देखील या गाण्यावर ठेका धरला आहे. रितेशने त्याच्या मुलांसोबत बाला या गाण्यावर डान्स केला असून सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.