पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

उच्च न्यायालयाचे प्रशासनाला न्यायालयाचे आदेश

मुंबई: नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या तिघा डॉक्‍टर आरोपींनी जामीनासाठी दाखल केलेल्या अपीलाच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहे.

डॉ. पायल पडवी हिने नायर रुग्णालयाच्या वसहतीगृहात 22 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघा डॉक्‍टरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाबरोबरच ऍट्रॉसिटी आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांन्वये आगरीपाडा पोलीसांनी अटक केली.

त्यानंतर सत्र न्यायालयाने या तिघींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सत्र न्यायालयाच्या जामीन फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिकेवर न्यायमूर्ती डी. एस. नायडू यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने तांत्रिकदृष्ट्‌या या जामीन अर्जावर खटला सुरू असलेल्या मुंबई सत्र न्यायालयातच सुनावणी होणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र या याचिकेत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने त्याची सुनावणी हायकोर्टात होऊ शकते, असे स्पष्ट करत न्यायालयाने अपीलावर पुढील आठवड्यात मंगळवार दि. 30 जुलैला सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

रेकॉर्डिंग होणारा पहिला खटला
ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतूदीनुसार खटल्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्‍यक असल्याची बाब ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायमूर्ती डी. एस. नायडूंनी यांनी ही बाब मान्य केली. एवढेच नव्हेतर आपण स्वत:देखील आयपॅडवर सुनावणीचे व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याचे उपस्थितांना दाखवले. महत्त्वपूर्ण खटल्यात बोललेली एखादी गोष्टी विसरू नये यासाठी आपण स्वत:च्या वापराकरता व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याची न्यायमूर्तींनी भर कोर्टात कबूली दिली. ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतूदीनुसार रेकॉर्ड करण्यात येणारा हा पहिला खटला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)