#व्हिडीओ : निवडणुकीत राजू शेट्टींची विकेट काढणार – शिवसेना

कोल्हापूर – बॅटिंग कोण करतंय याला महत्व नाहीये. या मतदारसंघात एखाद्या बॅट्समनने चांगली बॅटिंग केली म्हणून तो जिंकत नाही. तर इथली फिल्डिंग आणि रनिंग सुद्धा चांगली असावी लागते. बॅट्समनच्या चांगल्या कामगिरीपेक्षा टीम जिंकणे महत्वाचे असते आणि आता ही टीम जिंकायची असेल तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याची गरज असते. यामध्ये खासदार शेट्टी अपयशी झाल्याने त्यांची गुगलीने विकेट काढणार, असा विश्वास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सांगितलं. त्यामुळे उद्यापासून रंगणाऱ्या आयपीएलच्या थरारासोबत हातकणंगले मतदारसंघातील कसोटी सुद्धा लोकांना पाहायला मिळणार आहे.

हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी लढत होणार आहे. खासदार शेट्टी यांना यावेळी ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे शेट्टीं अनेक ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळत असल्याने त्यांच्याविरोधात बॉलर कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. आजच शिवसेनेकडून २१ उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेट्टींविरोधात बॉलर कोण हे स्पष्ट झाले असून धैर्यशील माने यांनी बॉलिंगची जोरदार तयारी केल्याचे त्यांनी म्हंटले आहे. फक्त आंदोलन करून जनतेचे प्रश्न सुटत नाही. तर लोकसभेमध्ये हे प्रश्न मांडून त्याबाबत कायदा तयार करणे हे चांगल्या लोकप्रतिनिधींचे काम असते. पण दुर्दैवाने प्रश्न तसेच राहिले असून मतदार मात्र अजूनही रस्त्यावरच आहेत. मुळात जनतेला रस्त्यावरच उतरण्याची गरज पडणार नाही असे काम करण्याची गरज असते. त्यामुळे आता बॉलिंगची जोरदार तयारी केली असून आमच्या गुगली समोर त्यांची बॅटिंग टिकणार नसल्याचेही यावेळी माने यांनी म्हंटले आहे.

त्यामुळे आता येणाऱ्या काळात हातकणंगले मतदारसंघात बॅटिंग चांगली होते की बॉलिंग हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)