विनाकारण रस्त्यावरून फिरणा-या युवकाला राजगुरूनगर पोलिसांचा चोप

राजगुरूनगर- करोना विषाणू रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन सुरू आहे. विनाकारण घरातून कोणीही बाहेर पडू नये.करोना विषाणू रोखण्यासाठी हाच एक मोठा पर्याय आहे मात्र असे असताना राजगुरूनगर शहरातून काही उत्साही तरुण रस्त्यावरून दुचाकीवर फिरताना दिसतात त्यांना राजगुरूनगर पोलिसांकडून चोप देण्यात येत आहे.

घरात थांबण्याचा अनेकजण प्रयत्न करीत नसल्याने पोलिसांना कायद्याचा आणि लाठ्यांचा वापर करावा लागत आहे. तालुक्यात आजच्या प्रशासनाच्या बैठकीत नागरिकाना आवश्यक व अत्यावश्यक सर्व सेवा सुविधा किराणा मालासह घरपोच देण्याची अमलबजावणी सुरू झाली असताना अनेक नागरिक किराणा व मेडिकल मध्ये गर्दी करीत आहेत.

ती रोखण्याचा पोलीस प्रयत्न करीत असून शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरल्यास गुन्हा दाखल करण्याची व चोप देण्यास खेड पोलिसांकडून सुरुवात झाली असून कोणही घराबाहेर पडू नये. असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.